डोळे उघडून अभ्यास केल्यास यश मिळतेच...
लोकसत्ता ह्या वृत्तपत्रात "स्पर्धापरीक्षा :अस्थिरश्वास! (युवास्पंदने,दि ३० मे) "या लेखातील मतांशी मी पूर्णपणे सहमत नाही.
(आपण हा लेख वाचला नसल्यास येथे पाहावा https://www.loksatta.com/yuva-spandane-news/mpsc-exam-preparation-for-competitive-exams-competitive-exams-in-2019-1902711/ )
"विद्यार्थ्यांची परिस्थिती त्यांच्या यश-अपयशाला बऱ्याचअंशी जबाबदार असते", असे म्हणणे म्हणजे अनेक सामान्य व्यक्तींचे असामान्य कर्तृत्व अमान्य करणे, आणि विशिष्ट वर्ग-परिस्थिती असणारेच यश मिळवू शकतील असे सुचविणे असे होय. हे मान्य होणे नाहीच.
असे असले तरी ,स्पर्धापरीक्षेचे मर्म समजून घेतल्याशिवाय यश मिळत नाहीच. काही नेमके मुद्दे पहा:
UPSC/MPSC साठी आयोगांनी केवळ २ गोष्टी दिल्या आहे-
१) परीक्षेचा सिलॅबस
२) मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका.
या दोन गोष्टींवरून अभ्यासाचे सूक्ष्मनियोजन करणे शक्य असते. मग त्यातून कोणते संदर्भ वाचावे हेही समजते. प्रश्नपत्रिका पाहिल्यास प्रश्नांचे स्वरूप-काठिण्य पातळी समजते. ह्यावरून कोणत्या परीक्षेत कोणते गुण आणि कौशल्य तपासले जाणार आहे हेही समजते. ह्याहून अधिक महत्वाचे परीक्षा अभ्यास हि साधना आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात तसे साधना नियमितपणे केली पाहिजे. त्यातून आपला अभ्यास म्हणजे जमीन आहे असे समजू. जमीन कसलेली असेल तर पडणाऱ्या पावसाने उत्तम फळ मिळेल. तसेच येणाऱ्या परीक्षेतून उत्तम फळ मिळेल-मिळतेच. जिथे अभ्यास नसेल, थोडक्यात जिथे मशागत नसेल तेथे धो-धो पाऊस पडूनही काहीही उपयोग होणार नाही, जमिनीची धूप होईल, तसे अभ्यासरुपी साधना न करणाऱ्याचे मानसिक खच्चीकरण होईल.
साधना करतांना जसे गुरुची गरज असते, तसेच अभ्यास करताना ही गरज पडतेच. जसे जगात भोंदूबाबा, त्यांचे कर्मकांड, मठ असतात तसेच स्पर्धापरीक्षा क्षेत्रात मोठमोठ्या संस्था, त्यांची पुस्तके, त्यांचे भंपक प्रदर्शन असतेच. या दोन्ही प्रकारच्या लोकांनी केलेल्या मार्केटिंगमुळे भक्त आणि विद्यार्थी बळी पडतात. नेमके काय केल्याने यश मिळेल याबाबत ते नको त्यांच्या पासून सल्ला घेतात आणि स्वतःचे मन आणि मेंदू गहाण ठेवतात. हे जेव्हा समजते तेव्हा उशीर झालेला असतो आणि मग वय वाढलेले असणे, केलेला अभ्यास खोडून काढून नवीन आणि योग्य पद्धतीने अभ्यास करणे जड जाते.
गुरु कोणाला करावे ह्याबाबत लेखकाने सचिन तेंडुलकरचे आणि त्याच्या गुरूंचे उदाहरण देऊन "घरी दारी वातावरण ही अनुकूल मिळाले म्हणून हे सगळे शक्य झाले हे कसे नाकारता येईल?" असे नमूद केलेलं आहे. असेच वातावरण एक सिद्ध गुरु आपल्या विद्यार्थ्यंनासाठी करतो. मुळात हे समजले पाहिजे कि स्पर्धा परीक्षा ह्या मुळतः व्यक्तिमत्व तपासणाऱ्या परीक्षा आहे. माणसाच्या अभ्यासातील सातत्य, वैज्ञानिक दृष्टीकोन, समाजाप्रती संवेदनशीलता आणि अधिकाऱ्यास शोभेसे वर्तन आणि विचार असल्यास यश मिळतेच. पण आपल्या व्यक्तिमत्वातील अनेक कोने एक उत्तम गुरूच हेरू शकतो आणि तोच आपल्या व्यक्तिमत्वास आकार देतो.
यश चोप्रा यांनी दिवार या चित्रपटातून अमिताभ बच्चन आणि शशी कपूर या दोघांना संधी दिली. शशी कपूर देखणा, सुदंर आवाज आणि एका अनुकूल वातावरण असणाऱ्या घरातून आला. अमिताभची उंची नको तेवढी होती, आवाज असा कि ज्याला आकाशवाणीने देखील नाकारले होते, चेहरा देखणा नाहीच. पण यश जोहारांनी अमिताभ कडून करून घेतलेल्या अभ्यासामुळेच दिवार आजही स्मरणात असतो तो अमिताभमुळेच. तिथूनच पुढे अमिताभ वयाच्या सत्तरीत युथ आयकॉन होते, आजही ते अनेकांसाठी रोल मॉडेल असतात, ह्यावरून एक सिद्ध गुरु काय करू शकतो हे समजते. स्पर्धापरीक्षेत अधिकारी पदावर असलेले गुरु असू शकतील.
दिल्ली आणि पुणे मध्ये ज्या संस्था आहेत त्यात एकाच वेळी ५०-१०० विद्यार्थी असतात- संस्थेचे मार्केटिंगसाठी अनेकजण नेमलेले असतात. तुमच्या डोळ्यापुढून त्यांचे चित्र हटूच नये म्हणून पेपर जाहिराती, सेमिनार्स, पॅम्फ्लेट्स, बँनर्स, सोशल मीडियाचा भडीमार असतो,
अश्या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी लांबच लांब रांग लागेल अश्यापद्धतीने प्रवेश दिले जातात.
सदाशिव पेठेत अश्या रांगांची चर्चा असते. मीडिया, अनेक स्वयंसेवी संस्था अश्याच संथ चालकांना सेमिनारसाठी आमंत्रित करते- मनामनांमध्ये असलेल्या असंख्य स्वप्नांना नवी पालवी फुटल्याच्या भावनेने आणि आश्वस्त भविष्याच्या आशेने असे सेमिनार सर्वाना आवडतात. मग आपोआप आपले मन अश्याच ठिकाणी जाते . या सर्वांवर आभासीपणाचे सावट असते हे वास्तव माहीत असूनही त्याचा वास्तव जीवनावर मोठा प्रभाव आहे, हे विद्यार्थी नाकारू शकत नाही. आपल्याअपेक्षा आणि त्यांची पूर्ती यांचे गुणोत्तर फारसे जुळत नाही हा अनुभव काही काळातच येतो आणि दुसरीकडे अपेक्षापूर्तीसाठी ज्यांच्याकडे आशेने पाहावयाचे त्यांनाच या परीक्षेतील मर्म समजलेले नाही याचे भान होणे, दोन्ही भावनेनं आपण फसलो याची भावना येणे- आणि मग "श्वास अस्थिर होतोय " हि भावना. म्हणजेच प्रचंड अस्वस्थता.
अभ्यासाबद्दल किंवा स्पर्धापरीक्षेतील करियरबाबत कुठल्यातरी नकोशा प्रसंगाला तोंड द्यावं लागू नये म्हणून किंवा कुठल्यातरी अवघड प्रसंगातून स्वत:ची किंवा इतरांची सुटका पटकन व्हावी म्हणून. स्वत:चा स्वार्थ साधायचा, या कारणासाठीही रेटून आणि जाणीव पूर्वक खोटं बोललं जातं.
खरे तर विद्यार्थ्यांनी कधी ध्यान, कधी प्रार्थना, प्रसन्न सुगंधी फुलापानांनी पूजा, कधी सगुण साकार तर कधी निर्गुण निराकार स्वरूप निवडून, काही करून हे मन स्वस्थ केले पाहिजे, अस्वस्थता ही देखील भावनिक मेंदूची एक अवस्था आहे. ती प्रयत्नांनी घालवावी लागते. ज्याची त्याला घालवावी लागते. मनोरंजनासाठी आसपास कितीही साधनं असली तरी ती काही काळा पुरतीच असतात. त्यामुळे आपणास आपलीच स्वस्थता शोधावी लागते. आणि मग विचार केला पाहिजे.विद्यार्थी मित्रांनी आणि पालकांनी याबाबत समजदारीने काम केले पाहिजे- एखाद्या अधिकारी व्यतिशी बोलले पाहिजे त्यांना या प्रशासकीय यंत्रणेबरोबर समाजातील करियर विषयक प्रवाहाची दिशा आणि दशा माहीत असते. आपले आयुष्य एखादे कौशल्य मिळवून सावरले पाहिजे.
मुंबईत तर अजून भयानक परिस्थिती आहे. मुळात स्पर्धक कमी, आणि क्लासेस दादर, ठाणे क्षेत्रात वसलेली. म्हणजे १२० किमी अनंतरवर पसरलेली मुंबई. त्यात भल्या भल्या पालकांना आपल्या घराजवळ क्लास हवा असतो- गुरु / मेंटॉर असल्या गोष्टींशी संबंध जोडून घेत नाहीच. मग मुंबईत क्लासवाल्यांकडून फसवा फसवीचे प्रकार चालतात. मला असे काही किस्से माहित आहे, २००८-०९ मध्ये विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यावर एका क्लासवर कायदेशीर बंदी आली होती. आता त्याच्या मालकांनी वेगळ्या नावाने क्लास चालवित आहे, सावध राहिले पाहिजे-
नेमके प्रश्न विचारले पाहिजे, जसे;
१) तुमच्या मुंबईच्या ..... ब्रांच मधून किती विदयार्थी पास झाले?
२) पूर्ण सिलॅबस कव्हर करण्यासाठी कोणती स्ट्रॅटेजी आहे?
३) जे शिकवणारे आहे, त्यांची सिद्धता किती-म्हणजे त्यांनी कोणत्या परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
आणि मुंबई पुण्यात महत्वाचा प्रश्न:
------------शिकवणारे passion म्हणून professionally शिकवीत आहे कि केवळ पैसे कमविण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी खेचून व्यापारीकरण करत आहे. कारण पुन्हा सांगतो,
------------------UPSC MPSC परीक्षा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा असून, पर्सनल मेन्टॉरिंग खूप महत्वाचे आहे.
मी मुंबई पुण्यात वर्गात आणि बाहेरगावच्या लोकांसाठी पोस्टल /ऑनलाईन कौन्सिलिंग, मेन्टॉरिंग करतो.
माझे ठाम मानणे असे आहे कि उत्तम आणि नियोजनपूर्वक अभ्यास केल्यास आणि योग्य दिशा मिळाल्यास यश मिळतेच -नव्हे ते खेचून आणता येतेच. व्यक्तिमत्वाच्या सर्व आयामांनी तपासून कोणती परीक्षा द्यायची ते ठरवले आणि तसे पाऊले टाकली, तर यश मिळतच. मुळात आपण कोणती स्पर्धापरीक्षा दिली पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे, त्यातील खाच-खोळगे सिद्धगुरूकडून माहित करून घ्याच. सुदंर यश मिळवा, त्याचा उत्सव करा. स्वप्ने बघा आणि भान राखून जगा उघडा डोळे - पहा नीट.
(संतोष वि रोकडे)
(santyrockspune@gmail.com), 9930075295


